झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. आपल्याला अधिपती आणि अक्षरा यांचा विवाह सोहळा देखील पाहायला मिळणार आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत मागच्या काही दिवसांत खूप ट्विस्ट येऊन गेले आणि प्रेक्षकांना ही ते खूप मनोरंजक वाटत आहे. आता पर्यंतच्या भागात आपण पहिले व्याही जेवणाचा कार्यक्रम होतो सगळे जण खूप खुश आहेत. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरी अक्षरावर कुठल्या गोष्टीचा दबाव टाकून लग्नासाठी तयार करत आहे ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय.
२८ आणि २९ सप्टेंबरच्या भागात आपण अक्षराच्या मेहेंदीचा कार्यक्रम पाहणार असून अक्षरा आणि अधिपतीची हळदही जोरदार धमाक्यात साजरी होणार आहे. दोघांच्या नात्याला नवीन वळण येणार असून ह्या हळदीच्या सोहळ्यात नक्की काय घडेल व अजून काही जबरदस्त ट्विस्ट येईल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.
अक्षरा आणि अधिपतीच्या मेहेंदी आणि हळदीचा कार्यक्रम पाहायला विसरू नका रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.





