प्रेक्षकांनी झी मराठीच्या सोशल मीडिया पेज वर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेचा १ ऑक्टोबरला होणाऱ्या विशेष भागाचा प्रोमो बघितलाच असेल. कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपतीसोबत लग्नासाठी तयार होते. दुसरीकडे भुवनेश्वरी खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे. लग्नातच इरा खोट बोलल्याचं अक्षराला कळणार आहे आणि अक्षराला याचा खूप मोठा धक्का बसणार आहे. आता नियती ही लग्नगाठ बांधेल का ?
सगळं खरं कळल्यावर अक्षरा लग्नाला तयार होईल का हे बघणं मनोरंजक ठरणार आहे. भुवनेश्वरीने राजशाही घाट घातलाच आहे तर लग्न समारंभ मोठा असणारच. झी मराठीच्या मालिकेचे सेट आणि जागा नेहमी सुंदर अश्या निवडल्या जातात आणि १ ऑक्टोबरच्या २ तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना एक भव्य असा लग्न सोहोळा पाहता येईल. या भागात एक खास सरप्राईझ पण असणार आहे. मालिकेतल्या कलाकारांना हा लग्न विशेष भाग शूट करतांना खूप मज्जा आली आणि एक वेगळाच उत्साह होता.
“तुला शिकवीन चांगलाच धडा” अधिक्षराचा लग्नसोहोळा २ तासाचा विशेष भाग पहायला विसरू नका १ ऑक्टोबरला संध्या ७:०० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.






