झी मराठीवरील टोटल हुबलाक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

झी मराठी वाहिनीवरील टोटल हुबलाक या मालिकेचा आज दिनांक ११ जुलै २०२० रोजी शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. हि मालिका एका खेडेगावातील मित्रांवर आधारित होती. घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे ते चोरी करायला लागतात. टोटल हुबलाक हि मालिका लॉकडाउन मध्ये सुरु झाली होती. सर्व मालिका बंद असताना या मालिकेने प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन केले. परंतु आत्ता १३ जुलै पासून जुन्या मालिकांचे नवीन एपिसोडस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणून टोटल हुबलाक या मालिकेचा शेवटचा भाग आज आपल्याला पाहायला मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


या मालिकेचा कालचा म्हणजेच १० जुलैचा भाग काही तांत्रिक कारणास्तव प्रदर्शित झाला नसल्यामुळे तो भाग आज ११ जुलैला रात्री ८ वाजता प्रदर्शित होईल आणि त्यानंतर ८:३० वाजता नेहमीप्रमाणे मालिकेचा पुढील शेवटचा भाग प्रसारित होईल. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. त्याशिवाय या मालिकेत राहुल मगदूम, महेश जाधव आणि अमरनाथ खराडे यांनी मित्रांची भूमिका साकारली आहे. टोटल हुबलाक या मालिकेचे दिग्दर्शन तेजपाल वाघ यांनी केले आहे.


आज दिनांक ११ जुलै रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार असून १३ जुलै पासून झी मराठी वरील सर्व मालिका परत रोज चालू होणार आहेत. तर मित्रानो टोटल हुबलाक या मालिकेतील कोणकोणते पात्र तुम्हाला खूप आवडले ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.

Title: Total Hublak Serial end

Tags: Total hublak serial end, total hublak malika samnpanr, total hublak malika end, total hublak serial off air, total hublak serial

Leave a Comment