निर्माते,दिग्दर्शक,अभिनेते,लेखक अशी ओळख असलेले महेश वामन मांजरेकर यांचा आज ६४ वा वाढदिवस. मराठी इंडस्ट्रीमध्ये महेश सरांचा आदरयुक्त दरारा आहे. नटसम्राट, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दे धक्का अशा नावाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांना ओळखल जातं. आणि आता लवकरच महेश सर ‘बिग बॉस मराठी’ चे चौथे पर्व घेऊन येणार आहे. टेलिव्हिजन वर महेश मांजरेकर यांना बिग बॉसच म्हणतात.
‘बिग बॉस मराठी’ मध्ये महेश सर ज्याप्रकारे सूत्रसंचालन करतात ते सगळ्याच प्रेक्षकांना आवडते, स्पर्धकांची दर आठवड्याला घेतली जाणारी शाळा यामुळेतर शो ला आणखीनच रंगत येते. काही प्रेक्षक तर केवळ याचसाठी ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघतात. पण याच शोसाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात हे कोणाला महित आहे का ?
माहितीनुसार , महेश मांजरेकर हे ‘बिग बॉस मराठी’ च्या एका एपिसोडसाठी २५ लाख रुपये इतके मानधन घेतात. हे मानधन आधीच्या दोन सीजनचे आहेत. आगामी सीजन मध्ये त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाल्याची शक्यता आहे. या मानधनाबाबतची कोणतीही माहिती अजुन समोर आलेली नाही.
१९८४ साली ‘अफलातून’ या बहुचर्चित मराठी नाटकातून त्यांनी अभिनयाच्या करकीर्दीला सुरवात केली. आणि आज महेश मांजरेकर यांच चित्रपटसृष्टीत मोठ नाव आहे.