मुंबईचा राजा अर्थात लालबाग मधील गणेश गल्लीच्या राजाची भव्य महाआरती करण्याची सुवर्ण संधी आपल्या झी मराठीच्या कलाकारांना मिळाली. तो क्षण कलाकारांसाठी व गणेश भक्तांसाठी अविस्मरणीय होता.
यात उत्साहाने सहभागी असलेले मालिकेतील कलाकार म्हणजे प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आयुष संजीव व अनुष्का सरकटे- ३६ गुणी जोडी , दीपा परब व आदित्य वैद्य – तू चाल पुढं आणि तितिक्षा तावडे व अजिंक्य ननावरे – सातव्या मुलीची सातवी मुलगी. तिन्ही मालिकेच्या कलाकारांनी भक्तांसोबत बाप्पाची महाआरती करून मनोभावे आराधना केली व आपल्या मालिकेचा प्रवास असाच छान चालत राहवा व प्रेक्षकांना नेहमी मनोरंजन होत राहावे अशी प्रार्थना केली. कलाकारांनी गणेश भक्तांसोबत संवाद साधला व प्रेक्षकांची मने जिंकली.
पाहत राहा तू चाल पुढं संध्या ७ वाजता , सातव्या मुलीची सातवी मुलगी रात्री १०:३० वाजता आणि ३६ गुणी जोडी रात्री ११ वाजता फक्त आपल्या आवडत्या झी मराठीवर.







