Tharal Tar Mag New Twist : ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागा मध्ये अर्जुन सायलीवर हसत असतो, त्याला कळालेल असत कस सायलीने आणि पूर्णा आजीने आजारपणाचा नाटक केलेलं असत. आणि त्यांचं ते नाटक फसलेल असत, आणि यामुळेच अर्जुन सायलीला चिडवत असतो.
सायलीला मात्र अर्जुन च हे अस वागण अजिबात आवडत नाही. आणि ती अर्जुनला सांगते की, घरातल कोणी नाराज असेल तर मला ते अजिबात चालणार नाही. त्यामध्ये मग , आई बाबा, आश्विन, मधू भाऊ, तुम्ही आणि पूर्णा आजी सुद्धा येतात.
सायलीने जवळच्या व्यक्तीनं मध्ये अर्जुन ला सुद्धा सामवून घेतलेलं असतं, त्यामुळे अर्जुन खूप खूश होतो. आणि झोपेत सुद्धा तो तेच आठवून हसत असतो.
दुसऱ्या दिवशी सायली आणि कल्पना, टेबल वर हिशोब करत बसलेले असतात. आणि त्यांचा हिशोब नीट लागत नसतो. त्यात काहीतरी गडबड झालेली असते. आणि त्याचवेळेस पूर्णा आजी तिथे येते. हिशोबामध्ये झालेल्या चुकीमुळे त्या कल्पना वर खूप ओरडतात आणि सायलीला सुद्धा बोलतात.
अस्मिता मात्र हे सगळं बगून खूप खूष होते. सायलीला रडायला येते, म्हणून ती रूम मध्ये निघून जाते. अर्जुन हा सर्व प्रकार पाहत असतो, अर्जुन विचार करतो की, एवढं सगळं होऊन सुद्धा पूर्णा आजी अस का वागत आहे काही कळत नाही , आणि तो रागात तसाच निघून जातो.
इकडे महिपत आणि साक्षी प्रियाने बनवलेल्या त्या व्हिडिओ चा विचार करत असतात. ते त्या प्रिया आणि त्या वीडियो च्या काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असा विचार करतात. अचानक साक्षीला एक युक्ती सुचते , ती ते सगळं महिपत ला सांगते, महिपत ला सुद्धा ती युक्ती आवडते.
इकडे सुभेदारांच्या घरी पुर्णा आजी विचार करत रूम मध्ये एकटीच बसलेली असते, तेवढ्यात तिथं कल्पना जाते आणि पूर्णा आजी ला विचारते की, तुमचा एवढा राग का आहे, सायली वर. पूर्णा आजी बोलते की कल्पना तुला फक्त तिचे गुण च दिसतात, बाकी काही नाही दिसत.
कल्पना पूर्णा आजीला उत्तर देते की, तुमच्या डोळ्यावरची पट्टी हटवली तरच तुम्हाला सायली मधले सर्व चांगले गुण दिसतील. ती जेव्हा पासून आपल्या घरात आली, त्यावळेस पासून ती सर्वांची काळजी घेते. आणि घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये ती खंबीर पणे उभी असते. पण तुम्ही मात्र नेमका कान डोळा करता तिच्याकडे.
पूर्णा आजी मात्र कल्पना च्या या बोलण्यावर दुर्लक्ष करते, आणि हे बगून कल्पना तिथून निघून जाते. कल्पना जाते आणि पूर्णा आजीला सायली घरात कशी आली, तिने काय काय केलं, हे सगळे क्षण तिला आठवू लागतात. सायली ने घरावरची संकटे कशी परतवून लावली, या सगळ्या गोष्टी ती आठवू लागते.
पूर्णा नंतर प्रतीमा च्या फोटो हातात घेते आणि बोलू लागते की, तुझी मुलगी अशी कशी, मला वाटलं होत की, तिच्यावर तुझे संस्कार असतील, पण तस तर काहीच दिसत नाही तिच्यात. माझी फार इच्छा होती की तुझीच मुलगी सुभेदारांच्या घरची सून झाली पाहीजे पण आता मात्र चित्र पालटलं आहे.
अर्जुन ऑफिस मधून सायलीला फ़ोन करत असतो, त्याला वाटतं असतं की सायली नक्कीच रडत बसलेली असणार. एकड सायली मात्र अर्जुनचा फ़ोन घेत नाही. अर्जुन सायली फ़ोन घेत नसल्यामुळे जास्तच टेन्शन मध्ये येतो, आणि तो घरी जायला निघतो.
अर्जुन घरी येऊन जोरजोरात पुर्णा आजीला हाका मारायला लागतो. अर्जुन काही बोलण्याच्या आतमध्येच पूर्णा आजी म्हणते की अरे तुम्ही सगळे आहात होय, मला पण तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. अस्मिता मात्र खूप खूश होते कारण तिला वाटत की, आता पूर्णा आजी सायलीची चांगलीच शाळा घेईल. पण होत मात्र भलतच!
पूर्णा आजी सायली समोर हात जोडते. आणि माफी मागते. ती म्हणते की सायली तू नेहमी या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलस. घरावर आलेल्या संकटांवर तू खंबीर पने मात केलीस. तुझ्यासारखी सुन या घराला भेटली, हे भाग्यच म्हणायचं. मी तुला माझी नातसून म्हणून स्वीकारत आहे.
पूर्णा आजी सायलीला घराच्या चाव्या देते. हा सगळा प्रकार पाहुन सायली चक्क पूर्णा आजी ला मिठी मारते.कल्पना सुद्धा रडू लागते. प्रताप आणि आश्विन हे सगळं पाहून आश्चर्य चकित होतात. अर्जुन सुद्धा हा सगळा प्रकार पाहून, खूप खूष होतो.
येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की, सायली खूप खूश असते कारण तिला पूर्णा आजीने नातसून म्हणून स्वीकारलेल असत.
हे पण वाचा :
ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू ला भेटली ही नवीन मालिका, दिल खास सर प्राइज!
Janhvi Killedar : या मराठी अभिनेत्रीच्या घरी झाली चोरी , आणि आईला आला अर्धांगवायु चा झटका!