Tharal Tar Mag New Promo : ठरलं तर मालिकेत आता अर्जुन आणि सायलीच्या प्लान प्रमाणे अर्जुन प्रिया म्हणजेच तन्वीशी प्रेमाच नाटक करत आहे. या प्लान प्रमाणेच अर्जुन प्रिया ला घेऊन डिनर डेट वर घेऊन जातो. डिनर डेट मध्ये अर्जुन आणि प्रिया रोमांटिक असा डांस करतात.आणि हा डांस सायली पाहते. प्रिया आणि अर्जुन ला एकत्र डांस करताना पाहून सायली चांगलीच संतापते.
या सर्व प्रकारबद्दल सायली अर्जुन ला जाब विचारते. सायली अर्जुनला म्हणते मधुभाऊना सोडवण्यासाठी त्यांच्या केससाठी मी तुम्हाला प्रिया सोबत डांस करायला सांगितल नव्हत.

अर्जुनला सायलीची मनधरणी कशी करारायची हे काहीच कळत नसतं. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो.
सायली पुढे पुढे आणि अर्जून मागे अशे ते एकेमेकांशी बोलत रस्त्यावरुन चालत असतात. मध्येच एक बाई रस्ता नीट बघता तो क्रॉस करत असते, आणि तिची टेम्पो बरोबर धडक होणारच असते की, सायली त्या बाईला वाचवते.
त्या बाईचा चेहरा अर्धा झाकलेला असल्याने आणि अर्ध्या चेहऱ्यावर जखमा असल्याने सायलीला तिचा चेहरा नीट दिसत नाही. परंतु ती बाई असते प्रतिमा. प्रतिमा म्हणजे पुर्णा आजीची मुलगी , तन्वी ची आई, अर्जुन ची आत्या. चेहरा झाकलेला असल्यामुळे सायलीला प्रतिमाची ओळख पटत नाही.
हे पण वाचा :
अर्जुन सायलीला वार्न करणार, त्यात लक्ष देऊ नकोस
जेव्हा पासून सायली त्या बाईला पाहते, तिला अस्वस्थ वाटू लागत. आणि ती विचारात मग्न होते. ती घरी येते आणि प्रतिमाचा एक फोटो घेते आणि त्यावर पेनाने रेगा मारते, काही जखमा सुद्धा पेनाने बनवते आणि त्या फोटो च्या अर्ध्या चेहऱ्यावर पांढरी ओढणी टाकते.

सायलीला ते पाहून धक्काच बसतो. सायलीने पाहिलेला त्या बाईचा चेहरा आणि प्रतिमाचा चेहरा हुबेहूब जुळत असतो. सायलीला जाणवत की ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमाच आहे.
ती लगेच हे सत्य अर्जुन ला सांगायचं ठरवते, आणि ती अर्जुन कडे हे सांगायला जाते. अर्जुन मात्र सायलीच काही ऐकून घेत नाही. उलट तो सायलीला बजावतो की, प्रतिमा आत्याचा मृत्यू झाला असून तुम्ही सुद्धा यात लक्ष देऊ नका.
प्रतिमाचा मृत्यू झाला आहे हे मात्र सायलीला पटत नसतं. अर्जुन सायली समोर हात जोडून विनंती करु की, तुम्ही यात पडू नका.
हे सर्व आपल्याला या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे. ठरलं तर मालिकेचे येणारे भाग खूप मनोरंजक असणार आहेत.