Tharal Tar Mag New Promo : स्टार प्रवाह वरील ठरलं तर मग मालिकेला अगदी कमी कालावधीतच लोकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेला महामालिकेचा सन्मान देखील मिळाला आहे. आत्ताच्या घडीला मालिकेने एक वेगळ वळण घेतल आहे.
ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीने सायलीला नात सून म्हणून स्वीकारल आहे. पूर्णा आजीने घरच्या सर्व चाव्या आणि घराची संपूर्ण जबाबदारी सायली ला दिली आहे.
पूर्णा आजीच हे रूप पाहून, सायलीला काय कराव ते कळत नाही. ती रडू लागते आणि ती पुर्णा आजी ला घट्ट मिठी मारते. अस्मिता ला हे अजिबात आवडत नाही.
परंतु कल्पना मात्र हे सगळ पाहून रडू लागते. आश्विन आणि प्रताप तर पूर्णा आजीच हे रूप पाहून दंगच राहतात. अर्जुन तर सायली आणि पूर्णा आजी ला मिठी मारताना पाहतो , आणि त्याला सुद्धा आनंद अश्रु येतात.
पूर्णा आजी सायलीला घराची जबाब दरी देते खरी पण , सायलीला मात्र एकच रुखरुख लागते की , मी पूर्णा आजीची फसवणूक करत आहे . ती अर्जुन ला म्हणते की , हे सगळे हक्क तुमच्या खऱ्या बायकोचे आहेत.
मी तर तुमची खोटी बायको आहे , मग मी हे सगळ कस तेवउ शकते आणि ती , पूर्णा आजीने दिलेल्या चव्या परत करायला निघते . अर्जुन तिला समजवतो , की तू जर या चव्या परत केल्या तर , पूर्णा आजी ला आणि घरातल्या सर्वांना आपल्यावर शंका येईल की , आपल लग्न खोट आहे म्हणून.
नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीने ठरल तर मग मालिकेचा नवीन प्रोमो आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर पोस्ट केला आहे. त्या प्रोमो मध्ये अर्जुन तन्वी ला म्हणजेच प्रिया ला मिठी मारताना दिसत आहे. नेमक अर्जुन अस का करत आहे , असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे .
प्रोमो मध्ये अर्जुन प्रिया ला म्हणतो की, इतके दिवस माझ्या लक्षातच नाही, पण मला आता कळतय की, तू मला खूप आवडतेस..प्रिया अर्जुन च हे बोलणं ऐकून.. त्याला अर्जुन अस म्हणत.. जवळ ओढून घेते आणि मिठी मारते.

दरवाज्या आड हुन सायली हे सगळं पाहत असते. जेव्हा ती अर्जुन ला प्रिया मिठी मारताना पाहते तेव्हा ती खूप चिडते.. आणि म्हणते मिठी मिठी..सोड मिठी.
अर्जुन प्रिया ला मिठी मारतो आणि सायलीला प्लान सक्सेस फुल झाल्याचा इशारा करतो. सायली नेच हा प्लान केलेला असतो मधुभाऊला सोडवण्यासाठी.
ती स्वतःशीच म्हणते की, हा प्लान माझ्या अंगाशी नाही आला म्हणजे झाल, काय काय सहन कराव लागणार आहे माहीत नाही.

आणखी वाचा :
ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू ला भेटली ही नवीन मालिका, दिल खास सर प्राइज!
आई कुठे काय करते मधील संजनाने घेतलं हक्काचं घर! – एकेकाळी राहत होती पत्र्याच्या घरात