‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसचं मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पडली आहे. तेजश्री सोशल मीडिया वर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्स सोबत संवाद साधत असते तसेच आपले विचार आणि फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करीत असते.
‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा आणि बबड्याची ऑनस्क्रीन जोडी रसिकांच्या प्रचंड पसंतीस उतरत होती. या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहोचली. दोघांचे फोटो एकत्र पाहून चाहत्यांनाही प्रचंड आनंद होतो. आशुतोषने तेजश्रीच्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांचा एकत्र फोटो शेअर केला होता . या फोटोला खास कॅप्शन देखील आशुतोषने दिले होते. त्यानंतर या दोघांमद्धे अफेअर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर तेजश्रीने कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या पण आता पहिल्यांदाच तेजश्रीची यावर प्रतिक्रिया आलीये.
तेजश्रीने एका मुलाखतीत सांगितले की , शुटींग सुरू असताना यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यामुळे आता ज्या चर्चा रंगत आहे ते काही नविन नाही. आशुतोष आणि मी फक्त चांगले मित्र आहोत . एकत्र काम केल्यामुळे आमच्यात खुप चांगली मैत्री झाली. आमच्यात मैत्रीपालिकडे जशा चर्चा रंगत आहेत तसे काहीही नाही. पुढे ती असेही म्हणाली की, नक्कीच मला लग्न करायलाही आवडेल . ज्याच्या सोबत लग्न करेन तो मला समजून घेणारा हवा . तो सिनेसृष्टीतला असला तरी चालेल.
तर तुम्हांला तेजश्री प्रधान ही अभिनेत्री आवडते का हे कॉमेंट्स मध्ये नकजकी सांगा .