आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री तेजश्री प्रधान ही झी मराठी वरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यांनंतर याच वाहिनीवरील ‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांची अजूनच लाडकी बनली. पण ती अग्गबाई सुनबाई या मालिकेत नसल्यामुळे प्रेक्षक थोडे नाराज होते आणि वाट पाहत होते ती तिच्या पुढच्या प्रोजेक्टची.
याचसंदर्भात तिने एक आनंदाची बातमी देत आता ती निर्माती म्हणून भेटीला येणार असं घोषित केलय. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव जाहीर केलय . ते नाव आहे ‘तेक ड्रीम्स’. तेजश्रीची मैत्रीण कीर्ती नेरकरसोबत तिने ही नवी प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आहे. तेक म्हणजे तेजश्री आणि कीर्ती या दोघींच्या नावचं कॉम्बिनेशन आहे असं तेजश्री सांगतेय.
तर तिच्या या घोषणेनंतर तिच्या सेलिब्रिटी मित्र मैत्रिणींपासुन ते चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच तिचे अभिनंदन केले आहे. या पोस्ट सोबतच तिने तिची मैत्रीण कीर्ती नेरकरचा फोटोही शेअर केला आहे. तर आता तेजश्रीचे ‘तेक ड्रीम्स’ प्रॉडक्शन हाऊस कोणकोणते नविन प्रोजेक्ट्स घेऊन येणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये आहे.