‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान साकारणार मुख्य भूमिका

अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एक खुप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे अभिनय कौशल्य खूपच छान आहे. ती खुप छान अॅक्टिंग करते. तेजश्रीने तिच्या अभिनयाची सुरुवात मालिकांमधून केली होती. तिच्या पदार्पणाची सुरुवात या गोजिरवाण्या घरात मालिकेपासून झाली. तिच्या सुपरहिट मालिका होणार सून मी ह्या घरची, अग्गंबाई सासूबाई या आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ती सध्या काय करते, असेही एकदा व्हावे, अन्य, जजमेंट, झेंडा अशा सिनेमामध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप पडली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ती आता अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सुबोध भावे यांच्या सोबत काम करणार आहे. शुभम फिल्म प्रॉडक्शन निर्मित,आनंद गोखले यांनी दिग्दर्शित केलेला ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटात तेजश्री आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्यांदाच या नव्या जोडीची onscreen chemistry आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल? या चित्रपटाचा पोस्टर कधी येईल याची माहिती अद्याप माहिती नाही.

‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या नावावरून कळते की हा चित्रपट लग्न या विषयावर असणार आहे. या चित्रपटाचे निर्माते शेखर मते आहेत, तसेच चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद गोखले यांची असून, मंदार चोळकर आणि क्षितीज पटवर्धन यांचं गीतलेखन आहे, पंकज पडघन यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल? याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. तेजू आणि सुबोध भावे यांच एकत्र अभिनय देखील आपण पाहणार आहोत.

Leave a Comment