अभिनेत्री तेजश्री प्रधान स्टार प्रवाह वरील मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मालिकेचे नाव प्रेमाची गोष्ट असून, 4 सप्टेंबर पासून रात्री ८:०० वा स्टार प्रवाहवर ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्रीच्या आईची भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले साकारणार असून, वडिलांची भूमिका अभिनेते योगेश केळकर साकारणार आहेत. तेजश्री सोबत राज हंचनाळे मुख्य भूमिका साकारणार आहे. राज आणि तेजश्रीची फ्रेश जोडी आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. तेजश्रीच्या पात्राचे नाव मीरा असून, राजच्या भूमिकेचे नाव सागर असे आहे. राजला एक सई नावाची छोटी मुलगी देखील आहे, असे मालिकेत दाखवण्यात आले आहे.
तेजश्रीला आपण शशांक केतकर, आशुतोष पतकी यांच्यासोबत काम करताना पाहिले आहे. आता राज आणि तेजश्रीची जोडी प्रेक्षकांना आवडते की नाही? ते मालिका पाहिल्यानंतर कळेल. राज हंचनाळेने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादाच्या भावाची भूमिका साकारली होती. त्यांनंतर त्याने जिवाची होतिया काहिली या मालिकेत अर्जुन नावाची मुख्य साकारली आहे.
प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपल्याला तेजश्री कधीही आई नाही होऊ शकत असे पाहायला मिळाले असून, तिचे अद्याप लग्न झालेले नाही. राज हंचनाळे याला एक मुलगी देखील आहे. त्याच्या पत्नीविषयी प्रोमो मध्ये दाखवण्यात आले नाही. कदाचित त्याची बायको त्याला सोडून गेलेली असावी किंवा त्याच्या पत्नीचे निधन झालेले असावे. तेजश्री आणि राज हे मालिकेत शेजारी दाखवले आहेत. राजच्या मुलीचे आणि तेजश्रीचे छान बॉंडिंग दाखवले गेले आहे.
तुम्हाला राज आणि तेजश्रीची नवी जोडी पाहायला आवडेल का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.