तमिळ अभिनेते विवेक यांचं वयाच्या ५९ व्या वर्षी चेन्नईमद्धे निधन झालं . १६ एप्रिलला हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करून ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आणि आज सकाळी ४ वाजुन ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास सोडला.
विवेक यांनी १५ एप्रिलला करोनो लसीसा पहिला डोस हा सरकारी रुग्णालयात घेतला होता. करोनाची लस ही सरकारी रुग्णालयात घेतल्यामागच कारण त्यांनी मीडियाला सांगताना म्हणाले की,’’कोव्हिड लस सुरक्षित आहे . पण लस घेतली म्हणजे आपण आजारी नाही होणार असं समजू नका. काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. लस घेतल्यामुळे फक्त आधीपेक्षा धोका कमी झालाय हे निश्चित होईल.’’
विवेक यांच्या निधनाच्या बातमीमुळे तामीळ सिनेसृष्टीतील अनेकांनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजलि वाहिली आहे .
A to Z मराठी कडून विवेक यांना भावपूर्ण श्रद्धांजली .