स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले दिसणार या नवीन हिंदी मालिकेत

स्वामिनी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेवती लेले आत्ता लवकरच आपल्याला नवीन हिंदी मालिकेत दिसणार आहे. लवकरच ती हिंदी मालिकेमध्ये पदार्पण करणार आहे. स्वामिनी या मालिकेत रेवतीने रमाबाई पेशवे यांची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हिंदी मालिकेत काम करणार असल्याची चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. परंतु तिने या मालिकेविषयी जास्त काही रिवील नाही केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रेवतीने पोस्ट मध्ये म्हंटले आहे की “माझा नवीन प्रवास सुरू होतोय. मालिकेत नवीन भूमिका साकारणार आहे. लवकरच मी तुम्हाला नवीन अवतारात  दिसेल.” या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री रेवती लेले “आपकी नज़रों ने समझा” या मालिकेत हीरोच्या बहिणीच्या रोलमध्ये दिसणार असल्याच सांगितल जात आहे. “बड़ी दूर से आए है हम” फेम अभिनेत्री पूर्वी व्यास तिच्या आईची भूमिका साकारणार आहे.

अगदी काही दिवसांपूर्वीच स्वामिनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अभिनेत्री रेवती लेले रमाबाई पेशवे तर अभिनेता चिन्मय पटवर्धन माधवराव पेशवे यांची भूमिका साकारत होते. या सुप्रसिद्ध मालिकेनंतर आत्ता रेवतीला नवीन हिंदी मालिकेमध्ये पाहण्यासाठी चाहते खूपच आतुर झाले आहेत. तर मित्रांनो अभिनेत्री रेवती लेले हिची नवीन हिंदी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Revati Lele New hindi serial, revati lele aapki nazron ne samjha new serial

Leave a Comment