सुंदरा मनामध्ये भरली मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप? कलाकारांनी शेअर केल्या भावुक पोस्ट……….

छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आल्या आहेत. मालिकेच्या चांगल्या कथानकमुळे मालिका प्रेक्षकांची मने जिंकतात. काही मालिकांचे कथानक देखील प्रेक्षकांना आवडत नाही, त्यामुळे मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप देखील घेतात. आता छोट्या पडद्यावरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून, ही मालिका कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली आहे. सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, याची माहिती सोशल मीडियावर या मालिकेतील कलाकारांनी दिली आहे. लास्ट डे, लास्ट शूट अशा पोस्ट कलाकारांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ही मालिका बंद होणार म्हणून प्रेक्षक नाराज देखील आहेत. लतिका आणि अभिमन्यु यांच्या प्रेमकहाणी मुळे सुंदरा मनामध्ये भरली मालिका लोकप्रिय झाली होती. लतिका आणि अभ्याची केमिस्ट्रि सर्वांना आवडायची. अभ्याचा मृत्यूनंतर मालिकेची trp कमी झाली होती. त्यांनंतर मालिकेत पाच वर्षांचा गॅप दाखवण्यात आला होता. मालिकेत आदिराची एंट्री झाल्यामुळे पुन्हा एकदा ही मालिका सर्वांची आवडती मालिका बनली. त्यानंतर लतिकाच्या आयुष्यात देवाची एंट्री झाल्याने तिला एक जोडीदार देखील मिळाला. दोघांचा साखरपुडा झाला असून, लवकरच लतिका आणि देवा विवाह बंधनात अडकून मालिकेचे कथानक देखील पूर्ण होणार आहे.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूट देखील कलाकार पूर्ण करत आहेत. अभिनेत्री अक्षया नाईक आणि अभिनेता कुणाल धुमाळ यांनी लास्ट शूटिंगचे फोटो त्यांच्या इन्स्टास्टोरीला शेअर केले आहेत. त्यामुळे ही मालिका बंद होणार आहे हे निश्चित आहे. या मालिकेच्या जागी कोणती मालिका दाखवली जाणार याची माहिती अद्याप तरी नाही.

तुम्ही सुंदरा मनामध्ये भरली मालिका आणि देवा – लतिकाच्या जोडीला मिस कराल का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment