Sumit Pusawale : बाळूमामा फेम अभिनेत्याचा गौफ्य स्फोट , ते पत्र मी अजूनही..कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या साकारलेल्या भूमिकांमुळे, सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे, किंवा केलेल्या वक्तव्यांमुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या आणि माध्यमांच्या चर्चेचा विषय बनतात. असाच एक चर्चेचा विषय ठरला आहे ‘बाळूमामा’ फेम अभिनेता सुमित पुसावळे. सुमित पुसावळे याने नुकतंच दिलेल्या एका वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अभिनेता सुमित पुसावळे ‘अल्ट्रा मराठी बझ’बरोबर बोलत असताना त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या. या आठवणी शेअर करताना सुमितने एक खास खुलासा केला की, त्याच्याकडे आजही त्याची मोठी चुलत बहीण विद्याताईने त्याला पाठवलेलं पत्र जपून ठेवलं आहे. या वक्तव्यामुळे सुमित चर्चेत आला आहे.
काय म्हणाला सुमीत?
रक्षाबंधन हा सण सुमित पुसावळेसाठी खूप खास आहे. तो आपल्या वैयक्तिक आयुष्यात हा सण कसा साजरा करतो, याबद्दल बोलताना सुमितने सांगितलं, “रक्षाबंधन हा माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला ओवाळणी देतो. हे फक्त एक नातं नाही, तर एक अतूट नातं आहे. बहीण-भावाच्या नात्यात जिव्हाळा आणि विश्वास असतो. या सणामध्ये एक वेगळाच आनंद असतो, कारण इतरवेळी सगळे जण आपापल्या आयुष्यात व्यग्र असतात, कामात गुंतलेले असतात. पण रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळे भाऊ-बहीण एकत्र येतात. मीही कामानिमित्त लांब राहतो, माझ्या बहिणीही घरापासून दूर राहतात. पण या सणानिमित्त आम्ही सगळे एकत्र येतो, जुन्या आठवणींना उजाळा देतो आणि आनंदात सण साजरा करतो.”
Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : अरबाज साठी सूरज चव्हाण एकटाच बास! वैभवला घराबाहेर काढा!
लहानपणी आई आपल्याला ओवाळणी देत सांगायची की बहिणीला दे, पण तू तुझ्या पैशाने बहिणीला पहिली भेट काय दिली होती, या प्रश्नावर सुमितने हसत सांगितलं, “लहानपणापासूनच मी माझ्या पैशानेच बहिणींना ओवाळणी देत आलो आहे. जेव्हा रक्षाबंधन किंवा भाऊबीज जवळ येत असे, त्याच्या महिनाभर आधीपासूनच त्याची तयारी सुरू व्हायची. आमची आजी बाजारात भाजीपाला, फळं विकायला जायची, तेव्हा आम्ही तिला मदत करायचो. ती ५० पैसे, २५ पैसे द्यायची. तेव्हा पाच-दहा रुपयेसुद्धा खूप मोठी रक्कम वाटायची, आणि ती जमवायला महिनाभर तरी लागायचा. जेव्हा मोठा झालो, कमावता झालो, तेव्हा माझ्या लहान बहिणीला मी घड्याळ दिलं, आणि मोठ्या बहिणीला कानातले दिले.”
सुमितने याबरोबरच आपल्या संघर्षाच्या काळात आपल्या बहिणीने कसा आधार दिला, याबद्दलही बोललं. “माझ्या संघर्षाच्या काळात, मला सांभाळणारी माझी लहान बहिण गौरी होती. मला हे सांगताना अजिबात लाज वाटत नाही,” असं तो सांगतो.
सुमितची मोठी चुलत बहीण विद्याताई दरवर्षी गावाकडून राखी पाठवायची, पत्र पाठवायची, ही आठवणही त्याने सांगितली. “मी सातवी-आठवीत असताना तिने मला एकदा बहीण भावाला राखी बांधत असल्याचं चित्र काढून पत्र पाठवलं होतं. ते पत्र माझ्याकडे आजही आहे. त्या पत्र येण्याची आम्ही आतुरतेने वाट बघायचो, जशी बाप्पा येण्याची वाट पाहतो, तशीच रक्षाबंधनची आतुरता असायची,” अशी आठवण सुमितने शेअर केली.
सुमित पुसावळे सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. त्याच्या या मालिकेतल्या भूमिकेचंही प्रेक्षकांमध्ये चांगलंच कौतुक होतं आहे. त्याच्या अभिनयामुळे आणि खास व्यक्तिमत्त्वामुळे सुमित पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Bigg Boss Marathi Arbaaj and Vaibhav : हे दोघं खरे परप्रांतीय.. देवा महाराजा..