जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित ही जोडी हॉट सीटवर येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. प्रेक्षकांची हि आवडती जोडी होणार करोडपती मध्ये एकत्र येणार आहेत. सुमित राघवन यांनी त्यांच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरवात केली. या विशेष भागात सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांनी त्यांना समाजाप्रती असलेल्या भावना आणि विषय या मंचावर मांडले. चिन्मयी सुमित यावेळी मराठी शाळांबद्दल व्यक्त झाल्या. त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेतच का दाखल केले याबद्दल त्या म्हणाल्या.
सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे नेहमी चर्चेचा विषय असलेली जोडी आता कोण होणार करोडपातीच्या मंचावर येत आहे. यावेळी सचिन खेडेकरांसोबत त्यांच्या कमाल गप्पा रंगल्या. सुमित राघवन च्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरवात झाली त्यानंतर नर्मदा नवनिर्माण अभियान यांचासाठी हा करोडपतीचा खेळ सुमित आणि चिन्मयी खेळणार आहेत. सचिन खेडेकरांसोबत चिन्मय आणि सुमित यांच्या सुंदर गप्पा रंगल्या. सुमित आणि चिन्मयी ची भेट कशी झाली त्यांनी त्यांच्या करियर ची सुरवात कशी केली याबद्दल धमाल किस्से आपल्याला या विशेष भागात पाहायला मिळणार आहेत. मराठी शाळांचे महत्व यावेळी सुमित आणि चिन्मयी यांनी पटवून दिले. मराठी शाळा टिकवणे किती महत्वाच्या आहेत याबद्दल ते बोलले.
नाटक, सिनेमा, मालिका असा ऑल राऊंड पेर्फोमन्स करणारी हि सुमित आणि चिन्मयी यांची जोडीचा सहभाग असलेला ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग 22 जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ते नर्मदा नवनिर्माण अभियान यांना देणार आहेत. आता नर्मदा नवनिर्माण अभियान साठी खेळताना ‘कोण होणार करोडपाती’च्या खेळात ते किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
पाहायला विसरू नका,’कोण होणार करोडपती’ विशेष, २२ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.