मराठी मनोरंजन सृष्टीतील दोन लोकप्रिय अभिनेते लग्नबंधनात अडकले. “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” आणि “लागीर झाल जी” मालिका फेम अभिनेता सुमित पुसावळे आणि अनेक मालिका त्याचबरोबर चित्रपटांमध्ये आपली छाप पाडणारा अभिनेता हरीश दुधाडे यांच्या लग्नाचा सोहळा थाटामाटात पार पडला.
अभिनेता सुमित पुसावळेला “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेने खरी ओळख मिळवून दिली. खूप दिवसांपासून सुमितच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर 14 डिसेंबर 2022 रोजी मोनिका महाजन हिच्याशी सुमितने लग्नगाठ बांधली. सहकलाकार, मित्रमंडळी आणि कुटुंबाच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला. “लागीर झाल जी” मालिकेत सुम्या ही व्यक्तिरेखा साकारून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केल होत. परंतू त्याला खरी ओळख मिळवून दिली ती “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेने. त्यामुळे चाहत्यांनीही सुमितचं भरभरून अभिनंदन केल आणि शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर पावनखिंड चित्रपटात बहिर्जी नाईक हे पात्र साकारून रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता हरीश दुधाडेनेही आपली जोडीदार निवडून बोहल्यावर चढला. हरीश दुधाडेने पत्नी समृद्धी निकम हिच्यासोबत लग्नमंडपात सात फेरे घेतले. हा लग्न सोहळासुद्धा पारंपारिक पद्धतीने पार पडला. हरिषणे अनेक मालिका त्याचबरोबर चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली पावनखिंड, फत्तेसिखस्त, गरुडझेप या काही चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. हरीशच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी हरीश आणि समृद्धीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.