स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीला आतापर्यंत आपण साडी मध्ये पहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे. जयदीपच्या मित्रमंडळींनी आयोजिय केलेल्या एका खास पार्टीसाठी गौरीने मेकओव्हर केलाय. पार्टी गाऊन मधला गौरीचा अंदाज पाहून जयदीपच्या मनात तर परी म्हणू की अप्सरा ही एकच भावना आहे. या पार्टीसाठीची सगळी तयारी जयदीपनेच केलीय. पार्टीमध्ये काय घालायचं, कसं वावरायचं या सगळ्या टिप्स जयदीपने गौरीला दिल्या आहेत.
गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा स्वतःला या नव्या रुपात पाहून फारच भारावून गेलीय. संपूर्ण टीमने मिळून तिचा हा लुक डिझाईन केला आहे. हा सीन करताना सेटवरही नवा उत्साह संचारला होता. जयदीप गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे. हेच प्रेम मालिकेतल्या या नव्या वळवला सुद्धा मिळेल हीच आशा आहे. तेव्हा गौरीचा हा हटके अंदाज पुढील आठवड्यात नक्की पहा रात्री 9.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.