महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत ओळखले जाणारे अरुण कदम आजोबा झाले आहेत. सर्वांना हसवणारे, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे अरुण कदम यांच्या घरी आज खुप आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या घरी एक छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यांची मुलगी सुकन्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सुकन्या आई झाली असून, सर्वांसाठी हा गोड क्षण आहे.
काही दिवसांपूर्वी सुकन्याचे डोहाळे जेवण खुप थाटामाटात पार पडले होते. तिच्या डोहाळे जेवणाची जोरदार तयारी सुकन्याच्या कुटुंबीयांनी आणि कदम कुटुंबाने केली होती. डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. सुकन्याचे मॅटरनिटी फोटोशूट पावसात शूट करण्यात आले होते. अरुण कदम यांनी आपल्या मुलीचे गरोदरपणात खुप लाड केले. सागर आणि सुकन्या यांचा डोहाळे जेवणाचा लुक खूपच सुंदर होता तसेच मॅटरनिटी फोटोशूट देखील पारंपारिक पद्धतीने करण्यात आले होते.
सुकन्या आणि सागर पोवळे यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. सुकन्या कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफीक डिजायनर आहे. सुकन्या आणि अरुण कदम या बाप लेकीचे रील्स विडियो देखील आपण सोशल मीडिया वर पाहतो.
atoz मराठी कडून पोवळे आणि कदम कुटुंबाला खुप साऱ्या शुभेच्छा.