स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या योद्ध्यांच्या अतुलनीयशौर्यानेशिवकालीन इतिहास झळाळून उठला आहे. अशा अनेकशूरवीर योध्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीयांना प्रेरित केले आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. ‘आधीलगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’ म्हणतकोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनीलिहिले गेले आहे. हाच सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ या भव्य चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उलगडलाजाणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच या ट्रेलरने १ मिलियनचा टप्पा पार केलाय. अतिशय वेगवान पद्धतीने ट्रेलरला लाखोंची पसंती मिळाली आहे.
अखेर निसटे शिवहस्तांतुनि तीरचि तान्हाजी प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी..
या शब्दांतून आणि ट्रेलरमधून सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजे निष्ठा, त्याग, समर्पण याचे मूर्तीमंत उदाहरण ही ओळख पटते. काही तासांत या ट्रेलरने कमाल केली आहे. या ट्रेलरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ट्रेलरला मिळाली आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेचस्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाद्वारे आपल्याला पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीरधर्माधिकार, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, शिवानी रांगोळे,नूपुर दैठणकर, भूषण शिवतरे, श्रीकांत प्रभाकर, बिपीन सुर्वे, अलका कुबल, राजदत्त, ऐश्वर्या शिधये, सौमित्र पोटे, संकेत ओक, सुनील जाधव, मंदार परळीकर, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, दिग्विजय रोहिदास, रिषी सक्सेना, ज्ञानेश वाडेकर, मृण्मयी देशपांडे, दिग्पाल लांजेकर, आस्ताद काळे, पूर्णानंद वाडेकर आदि मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या असीमशौर्याची गाथा उलगडणारा ‘सुभेदार’ चित्रपट १८ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.




