स्टार प्रवाह वरील वैजू नंबर या मालिकेतील वैजू म्हणजेच अभिनेत्री सोनाली पाटील एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ यात ती दिसणार आहे. सोनालीने तिच्या इस्टाग्राम हॅंडल वर पोस्ट शेअर करत मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात .. पहा देवमाणूस रोज रात्री १०.३० वाजता. फक्त झी मराठीवर अस कॅप्शन दिले आहे. तिने याआधी स्टार प्रवाह वरील वैजू नंबर १ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. तसेच सोनी मराठी वरील जुळता जुळता जुळतय की’ या मालिकेत देखील सोनाली दिसून आली. तसेच आता ती आर्या देशमुख या वकिलाच्या भुमिकेत दिसत आहे.
तर तुम्हांला सोनाली पाटील ही अभिनेत्री आवडते का ? तीची भूमिका कशी वाटते हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.