अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या साखरपुड्याचे पहा काही खास फोटो

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिज्ञा भावे, सई लोकुर, मानसी नाईक, सिद्धार्थ मिताली बरोबरच आता सोनाली कुलकर्णी देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबई मध्ये झाला होता. ही बातमी तिने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या चाहत्यांना दिली होती. त्यावर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

आणि आता म्हणजेच २ फेब्रुवारी २०२१ ला साखरपुड्याला १ वर्ष पुर्ण झाले त्यानिमित्ताने तिने ह्या दोघांचा फोटो शेअर करत ‘साखरपुड्याच्या पलीकडे लग्नाच्या अलीकडे’ असं कॅप्शन दिले आहे.

सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही काम केले आहे.

Tags: Sonalee Kulkarni Engagement Photo, Sonalee Kulkarni Sakharpuda, Sonalee Kulkarni Husband

Leave a Comment