कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन तिसराचा दूसरा आठवडा सुरू झाला आणि सुरू होताच बिग बॉस यांनी सदस्यांनावर “हल्लाबोल” हे कार्य सोपावले. ज्यामध्ये दोन टीम करण्यात आले आहेत. काल मोटर बाईकर सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील बसल्या. सुरेखाताई ठामपणे आपला मुद्दा मांडताना दिसल्या. आम्ही इथे आलो आहेत तर आम्ही खेळताना दिसलो पाहिजे, कॅप्टन बनण्याची इतकी हौस नाहीये. बर्याच चर्चेनंतर सोनाली आणि सुरेखा ताईंसोबत टास्कला सुरुवात झाली. त्यानंतर मोटर बाईकवर बसायला आले विकास आणि विशाल. हा टास्क आजच्या भागामध्ये देखील बघायला मिळणार असून हे दोघे किती वेळ बाईकवर बसू शकतात हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. टास्क जिंकण्यासाठी टीममधील सदस्य अनेक फंडे वापरताना दिसणार आहेत. आजच्या भागामध्ये बघूया काय काय होते.
हल्लाबोल टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी विरुध्द टीमचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात ना टास्क के लिये कुछ भी ! टास्कच्या दरम्यान, आविष्कार विकास आणि विशालला धीर देताना दिसणार आहे, “मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे. त्यावर स्नेहा आविष्कारला उद्देशून बोलताना दिसणार आहे “जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार”? आता स्नेहाच्या या टोमण्यावर आविष्कारकाय उत्तरं देणार ? त्यांच्यामध्ये वाद होणार ? कळेलच आजच्या भागामध्ये.
तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.
