अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाच्या विधींना सुरवात झाली आहे. ग्रहमखचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना सिद्धार्थने सोड मुंज झाली, आता जातो काशीला ओके बाय अशी फनी कॅप्शन दिली आहे.
मराठी सिनेसृष्टीत सध्या सनई चौघड्यांचे सुर ऐकू येत आहेत. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णी, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्याही लग्नाचे सुर ऐकायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर तो क्षण आला आणि आता हे कपल त्यांच्या आयुष्याची नविन सुरवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या दोघांच लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामद्धे होणार आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खुप उत्साही आहेत. लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते चाहत्यांसह शेअर करत असतात.
Tags: Siddharth Chandekar and Mitali Mayekar wedding rituals starts