कलर्स मराठी वरील शुभमंगल ऑनलाइन ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे . या मालिकेच्या शुटींगचा शेवटचा दिवस म्हणून शंतनू म्हणजेच अभिनेता सुयश टिळकने भावूक पोस्ट शेअर केली आहे.
आज हा प्रवास संपला,चित्रिकरण संपलं . मालिका तुमचा निरोप घ्यायला अजून थोडा अवकाश आहे. प्रेम आणि आशिर्वादासाठी मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. नवीन प्रवास सुरू होण्या आधी हे लिहावसं वाटलं (नाही नवीन प्रवास म्हणजे बिग बॅास च्या घरात मी नाहीये तर कृपया तश्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका)
“शंतनू सदावर्ते.” आजपर्यंत केलेल्या पात्रांपैकी वेगळं, हळवं,गडबडलेलं, पण सावरू पहाणारं पात्र. आजच्या पिढीतला तरूण मुलगा आणि त्याची गोष्ट. मालिकेची सुरूवात वेगळ्या नोट वर झाली खरी, पण पुढे त्यात वेगवेगळी वळणे येत गेली त्या प्रमाणे शंतनुला समजून घेणं कधी सोप्पं तर कधी अवघड होत गेलं. माझ्या मुळ स्वभावाच्या अगदी विरूद्ध जाणारा शंतनू मला सापडेल का नाही ह्याची मनात खूप भिती होती. पण शंतनू बरोबर मला मज्जा आली. मी रोज वेगळ्या mindset नी शंतनू ला समजून घेत होतो. ह्या सगळ्या प्रवासात नवीन कुटुंब जमलं. सुबोध दादा मंजिरी ताई कडून प्रेमाची कौतुकाची आपुलकिची थाप वेळोवेळी आत्मविश्वास वाढवत गेली.
मनिष दादा, वैभव सर, मंजिरी ताई ह्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याची मजबूत कसोटी लागली होती. दररोज वेगळं आव्हान समोर होतं. दिपा ताई तुला पण मनापासून धन्यवाद मला शंतनु म्हणून पाहीलस त्यासाठी. तसेच त्याने संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.
तर तुम्ही ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेला मिस कराल का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.