अभिनेत्री सायली संजीव हिच्या पायाला दुखापत

कलर्स  मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतील अभिनेत्री सायली संजीव हिचा पाय फ्रॅक्चर होऊन ती घरी आराम करत असल्याची बातमी कळाली आहे. सायलीने याबाबतची कोणतीच माहिती सोशल मीडियावर दिली नव्हती परंतु सायलीची जवळची मैत्रीण हृता दुर्गुळेने ही बातमी सोशल मीडियाद्वारे सांगितली. हृता तिला तिच्या घरी भेटायला गेली असता सायलीचा फोटो काढून सोशल मीडिया वर शेअर केला ज्या फोटोत सायली खिडकीजवळ बसली आहे आणि तिचा डावा पाय फ्रॅक्चर असल्याच दिसून येतय.

सायलीला पाय फ्रॅक्चर असल्यामुळे घरीच विश्रांती करायला लागत आहे. त्यामुळे तीला शूटिंग करणं शक्य नाही . पण ती लवकरच बरी होऊन पुन्हा शूटिंग करणार असल्याचं सांगितल आहे. तिचे चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

 सायली संजीव ही अभिनेत्री आपल्याला ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत दिसली होती , त्यानंतर आता ती ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेत सुयश टिळक सोबत मुख्य भुमिकेत दिसत आहे.

Leave a Comment