छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. यात अनेक कलाकार स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्या सोबतच कीर्तनकार शिवलीला पाटील देखील त्यात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. पण तिच्या चाहत्यांना काही ते फारस आवडलेल नाहीये.
‘शिवलीला ताई तुम्हाला बिग बॉसच्या घरात जाण्याची गरजच नव्हती, अस एका चाहत्याने म्हंटल आहे. तर ‘ताई तुमचा निर्णय चुकीचा ठरेल,’समाजाला तुमची गरज आहे,बिग बॉसला नाही, ‘स्वतःची ओळख पुसण्याच काम करेल ही’ अशा प्रकारच्या अनेक कॉमेंट्स करत शिवलीला हिला ट्रॉल करण्यात येतय .
शिवलीला ही वयाच्या पाचव्या वर्षापासून कीर्तन करते. तिचे वडील देखील कीर्तनकार आहेत. तिच मुळ गाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे आहे. शिवलीलाने आज पर्यंत असंख्य कीर्तन केलेली आहेत.
तर तुमचं या सगळ्यावर काय मत आहे हे कॉमेंट्स करून नक्की सांगा.