अभिनेत्री शिवानी सुर्वे हिचा बॉयफ्रेंड आहे प्रसिद्ध अभिनेता,करतोय या नवीन मालिकेत काम

अभिनेत्री शिवानी सुर्वे ही स्टार प्रवाह वरील ‘देवयानी’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आणि अजुनही ती प्रेक्षकांच्या मनात आहे. शिवानी आपल्याला बिग बॉस सीजन २ मध्ये देखील पाहायला मिळाली. ट्रिपल सीट या मराठी चित्रपटात देखील टिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली.  तिने देवयानी , सुंदर माझ घर , तू जीवाला गुंतवावे , यांसारख्या मालिकेंमध्ये काम केली आहेत.  तसेच तीने  २०१६ ला हिंदी मालिका ‘जानाना दिल से दूर’ यामध्ये देखील शिवानीने मुख्य भूमिका साकारली होती. २०१८ मध्ये ‘एक दीवाणा था’ त्याचप्रमाणे अँड टीव्ही वरील लाल ईश्क यामध्ये देखील शिवानी दिसून आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कलर्स मराठी वरील बिग बॉस सीजन २ मध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वेने तिच्या आणि अभिनेता अजिंक्य ननावरेच्या नात्याबद्दल सांगितले होते . स्टार प्रवाह वरील ‘तु जीवाला गुंतवावे’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले . आणि त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरवात झाली असं अजिंक्य म्हणतो. कलर्स मराठी वरील ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेत अजिंक्य आदित्य शिर्केची भूमिका साकारताना आपण पाहत आहोत.  अजिंक्य आणि शिवानी एकमेकांसोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रेक्षकांनाही त्यांची जोडी खुप आवडते .

 तर तुम्हांला अजिंक्य आणि शिवानी सुर्वेची जोडी कशी वाटते हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.  

Leave a Comment