‘लगिर झालं जी’ फेम आणि आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर हिने एक पोस्ट शेअर करत तिची कोविड टेस्ट positive असल्याची बातमी सांगितली आहे.
सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही , दुर्दैवाने माझी कोविड चाचणी positive आली आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत , मी माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे . मी सर्वांना विनंती करते की कृपया अतिरिक्त खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा. सुरक्षित रहा आणि निरोगी रहा . भेटू लवकर. खुप प्रेम शिवानी बावकर . अशी पोस्ट तिने केली आहे .तिच्या या पोस्ट वर कलाकारांसोबतच तिच्या चाहत्यांनी लवकर बरी हो , काळजी घे अश्या कमेंट्स करत तिच्याबद्दल वाटणारी काळजी व्यक्त केली आहे.

लगिर झालं जी या मालिकेतून शिवानीने सर्व रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. तिचं शितली हे पात्र खूपच गाजल होत. त्यानंतर शिवानीने काही अल्बम सॉन्ग देखील केले.