अवघ्या कमी वेळेत कलर्स मराठीवरील ‘शेतकरीच नवरा हवा’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील सयाजी आणि रेवा ही नवीन जोडी सर्वांची आवडती जोडी आहे. पाहुणीबाय आणि सया ही जोडी खुप हीट आहे. कलर्स मराठी अवॉर्ड २०२३ मध्ये या मालिकेने खुप सारे अवॉर्डस आपल्या नावी केले आहेत. या मालिकेला प्रेक्षक खुप पसंती देत आहेत. शेतकरी कुटुंबातील गरीब मुलगा आणि शहरातील श्रीमंत घरची मुलगी या दोघांची प्रेमकहाणी या मालिकेत दाखवण्यात आली आहे. या मालिकेतील नकारात्मक पात्र ‘सूर्यकांता’ म्हणजेच अभिनेत्री सुरेखा कुडची यांना प्रेक्षक खुप पसंद करत आहेत.
मालिकेत केल्या काही दिवसांत रेवाचा बालपणीचा मित्र ‘रोहन’ म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर याची एंट्री झाली होती. रोहन हा रेवावरती प्रेम करत होता. पण कुठेतरी रेवाच्या मनात सयाच्या प्रेमाची कळी खुळली होती. सयाजीपण रेवावरती प्रेम करायचा. पण आपण शेतकरी, ही काळी मातीच आपली जन्मभूमी, कर्मभूमी, रेवा ही शहरात वाढलेली मुलगी. तिला खेड्यात कसं काय जमणार? असा विचार सयाजी करायचा. अखेर दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली देऊन, एकमेकांसोबत संसाराची स्वप्ने पाहिली. सयाने आपल्या ‘पाहुणीबायला’ अखेर होकार दिलाच.
नुकतेच सयाजी आणि रेवाच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटोज, विडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही हळदीच्या जोड्यामध्ये खुप सुंदर दिसत आहेत. रेवाने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून, सयाजीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. या दोघांचा मेहंदी कार्यक्रमपण खुप छान पार पडला. रेवा मेहंदीच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. हळदी, मेहंदी आणि लग्न सयाजीच्या वाड्यावरतीच पार पडणार आहे. हळदीचा मेहंदीचा कार्यक्रम अगदी गावाकडच्या साध्या आणि सोप्या रीतीरिवाजनुसार झाला. रेवा आणि सयाजीचा विवाह अगदी गावाकडच्या पद्धतीने पार पडणार आहे. लग्न हे येत्या रविवारी १४ मे, दु. 12:00 वा. आणि संध्या. 7:00 वा. कलर्स मराठीवर आहे
सया आणि पाहुणीबाय यांच लग्न पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.