मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने ख्रिसमसचं निमित्त साधत चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. शशांक केतकरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असून तो लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शशांकने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, शशांकने ही गुड न्यूज शेअर करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांपासून सेलेब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो ही आपल्या सगळ्यांना महित आहेच. पण, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंपैकी एखादी भेटवस्तू इतकी सुंदर असू शकते याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. तुम्हा सगळ्यांना यांच्या तिघांकडून हॅप्पी हॉलिडे आणि नाताळच्या शुभेच्छा’’, अशी पोस्ट करत शशांकने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली.
Tags: Shashank Ketkar wife Priyanka Dhawale is pregnant