अभिनेता शशांक केतकर त्याची गर्लफ्रेंड प्रियांका ढवळेसोबत विवाहबंधनात अडकला. शशांकचे हे दुसरे लग्न तर प्रियांकाचे पहिले लग्न आहे. शशांक केतकरने पहिली पत्नी आणि होणार सून मी ह्या घरची मालिकेतील त्याची कोस्टार तेजश्री प्रधानसोबत लग्न केले होते. पण कालांतराने त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. आता शशांकने दुसरा संसार प्रियांकासोबत थाटला आहे. शशांकची पत्नी प्रियंका ढवळे वकील आहे. तर आज आपण शशांक आणि प्रियांका यांची प्रेमकहाणी जाणून घेणार आहोत.
शशांक आणि प्रियांकाची पहिली ओळख फेसबुकवर झाली होती. दोघे एकमेकांशी फेसबुकवरच गप्पा मारत असत. पण कालांतराने त्यांचे बोलणे कमी झाले. शशांक त्याच्या कामात बिझी झाला. शशांक सोशल मीडियाचा वापर फारच कमी करतो त्यामुळे त्याने त्याच्या फोनमधील व्हॉट्सअपही बंद केले होते त्यामुळे त्यांचे बोलणे अजूनच कमी झाले. एक ते दीड वर्ष त्यांचे बोलणे पूर्ण बंद होते.
प्रियांका ढवळे उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. तिने अरेंगत्रमही पूर्ण केले आहे. त्यामुळे कलेची उत्तम जाण प्रियांकाला आहे. इतकेच नाही तर शशांक तिला उत्तम क्रिटीक मानतो. त्याच्या अभिनयातील खाचगळाही प्रियांका त्याला उत्तम सांगते. जर संधी मिळाली तर अभिनयात हात आजमवायलाही आवडेल असेही तिने सांगितले.
शशांक ला आऊटिंग करायला आवडत नाही याउलट प्रियांकाला आउटींग आणि नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायला फार आवडते. पण शशांकला घरात बसून वेळ घालवायला आवडते. घरात बसायला आवडत असेल तरीही शशांक रोमँटीक आहे असे प्रियांका सांगते.
प्रियांका उत्तम स्वयंपाकीण नसली तरी आता ती नवनवीन डिश ट्राय करायला शिकली आहे. प्रियांका आणि शशांक यांनी त्यांच्या आईने सांगितल्याप्रमाणे गुळाची पोळी आणि पोहे यांसारखे सोपे पदार्थ करुन पाहायला सुरुवात केली आहे. फार कमी जणांना माहीत आहे की शशांक उत्तम कुक आहे आणि मोमोज् आणि चायनीज पदार्थ ही त्याची खासियात आहेत.
शशांकने सांगितले की, एखाद नात घडायच असेल तर ते फार सोप्प असत पण आपण उगाच त्याला अवघड करुन बसतो. अगदी फिल्मी स्टाईलने सुरु झालेली शशांक-प्रियांका यांची एक भेट ते आता त्यांच्या लग्नात झालेल रुपांतर फारच अजब आहे. दोघांच्या स्वभावात फार अंतर असले तरी आम्ही एकमेकांच्या रिकाम्या जागा उत्तमपणे भरुन काढतो असे त्याने सांगितले.
Tags: Shashank Ketkar Lovestory,Shashank Ketkar and Priyanka Dhavale Lovestory,Shashank Ketkar priyanka Ketkar lovestory, shashank & Priyanka,Shashank Ketkar wife