लग्नानंतर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिची पहिली मकर संक्रांत आणि हळदी कुंकू

मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने नुकतचं तिचं लग्नानंतर पहिली मकरसंक्रांत आणि हळदी कुंकू तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच तेजस देसाई सोबत साजरं केलं. या शुभप्रसंगी शर्मिष्ठा राऊत खूप आनंदी आणि उत्साही होती. ती काळ्या रंगाच्या साडीत आणि हलव्याच्या दगिन्यांमद्धे खुप उठून दिसत होती. तसेच बिग बॉस मराठी सीजन १ ची विजेती मेघा धाडे यांनीही ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत शर्मिष्ठा आणि तेजस ला त्यांच्या उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनेत्री स्मिता शेवाळे ह्यांनी देखील ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लग्नानंतर तिच्या आयुष्याविषयी आणि तिच्या पहिल्या हळदी कुंकू साजरं करताना शर्मिष्ठा म्हणाली, “मी माझी पहिली मकरसंक्रांत आणि हळदी कुंकू साजरी करीत आहे. पूर्वी मी एकटी होते मी माझ्या मित्र –मैत्रिणींना त्यांच्या पार्टनर सोबत festive साजरे करताना पहायचे पण आता मी पण commited आहे. आणि ही माझ्यासाठी unbelievable भावना आहे. लोक बोलतात की लग्नानंतर नवरा बदलतो परंतु तेजस बिलकुल बदलला नाहीये. आमचं प्रेम , आपुलकी अजिबात बदलली नाहीये. मी म्हणेन की मी जबाबदाऱ्यांमुळे थोडी बदलले असेन परंतु तो आहे तसाच आहे.”

शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी नुकताच मालदिव मद्धे हनीमून चा आनंद लुटला आणि समुद्राच्या किनारी एकांत वेळ घालवला .

Tags: Sharmishtha Raut First makar sankrant after marriage

Leave a Comment