Sharayu Sonvane Wedding : पारू या मालिकेतील पारू ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनवणे हिने इन्स्टाग्राम वर एक पोस्ट टाकत आपल लग्न एक वर्षापूर्वीच झाल असल्याचा खुलासा केला आहे . तिने तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्त लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्री शरयू सोनवणे हिने पारू या मालिकेच्या आधी पिंकीचा विजय असो ही मालिका केली होती. आणि गेल्या वर्षी शरयू ने या मालिकेतून काढता पाय घेतला आणि जयंत लाडे सोबत लग्न केल्याचे जाहीर केले आहे. गेल्या वर्षी ३ मे २०२४ रोजी शरयू ने जयंत लाडे सोबत लग्नाची गाठ बांधली होती याचा खुलासा तिने स्वतः केला आहे. आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसा निमित्ताने तीनर लग्नाचे फोटो शेयर केले आहेत.

मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्री कामामुळे लवकर लग्न करत नाहीत असा एक समज आहे. लग्न झालेल्या अभिनेत्रींचा चाहता वर्ग कमी होतो आणि त्यामुळेच की काय सर्व अभिनेत्री लग्नाकडे पाठ फिरवायच्या. पण आता चित्र पालटलं आहे बहुतेक कलाकार लग्न करुन सेटल होण्याला महत्व देताना दिसत आहेत.
कोण आहे शरयू चा नवरा?
शरयू सोनवणे म्हणजेच झी मराठी वरील पारू मालिकेतील पारू. शरयू ने पारू मालिकेच्या आधी पिंकीच विजय असो या मालिकेतून काढता पाय घेतला होता. शरयू ने मागच्या वर्षी पिंकीचा विजय असो ही मालिका सोडत आपल लग्न उरकल्याच कळतय, शरयू ने फिल्मेकर जयंत लाडे सोबत लग्न गाठ बांधली आहे. आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शरयूने आपल्या नवऱ्या सोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंट वर शेयर केले आहेत.
शरयू सोनवणे ने आपल्या लग्नाचे काही क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. तिने तिच्या लग्नात पांढऱ्या कलर ची साडी नेसली असून तीच्या नवऱ्याने सुद्धा पांढरी शेरवाणी घातली आहे. शरयूच्या लग्नाचा थाट अगदी राजेशाही होता. शरयू ने आपल लग्न चाहत्यांन पासून का लपवल? आणि एका वर्षा नंतर जाहीर का केल? हे असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहेत.



आणखी वाचा :
Antarpaat Serial : कलर्स मराठी ची नवीन आगळी वेगळी मालिका!
Kanyadaan Serial : कन्यादान मालिकेतील आणखी एक अभिनेता अडकला विवाह बंधनात!
Juna Furniture Box Office Collection : जुनं फर्निचर या चित्रपटाने कमावले तब्बल ईतके पैसे!