गायिका ‘सावनी रवींद्र’ ने नुकतीच सोशल मीडियाद्वारे एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. तिने तिचे पती डॉ. आशिष धांडे यांच्यासोबत फोटो शेअर करत ते दोघे लवकरच आई बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे. नुकताच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
सावनी रवींद्र या गोड भावना व्यक्त करताना म्हणते की “माझ्या मनात सध्या अलौकिक भावना आहेत ज्या मी शब्दात सांगू शकत नाही. आजवर मी गायिका असल्यामुळे आईपणावर वेगवेगळ्या थाटणीची गाणी गायली आहेत. अंगाई गीत , डोहाळजेवणाचे गीत , बरश्याची गाणी मी याआधी गायली होती . पण आता मी स्वतः त्या भुमिकेत जात आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खुपच उत्सुक आहे. मला असं वाटत की प्रत्येक स्त्री ही भाग्यवान असते . कारण ती आई होऊ शकते. आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या फेजचा मी पुरेपूर आनंद घेत आहे.