तुझ्यात जीव रंगला मालिकेतील या अभिनेत्रीचे निधन.

मराठमोळी अभिनेत्री सरोज सुखटनकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी बुधवारी निधन झाले आहे. त्यांनी खूप साऱ्या मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली होती. ही बातमी कळताच तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार देखील भावुक झाले आहेत.

सरोज यांनी आपल्या मूळ गावापासून नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांच मूळ गाव रुई. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. नर्तकी या त्यांच्या गाजलेल्या नाटकाचे ३०० हून अधिक प्रयोग पार पडले होते. मराठी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. अलका कुबल यांच्या समवेत त्यांनी धनगरवाडा या चित्रपटात शेवटचे काम केले. त्याशिवाय त्यांनी एकटा जीव सदाशिव, जोतिबाचा नवस, दे दणादण, लेक चालली सासरला या चित्रपटांत देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

आत्ता चालू असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत देखील सरोज सुखटनकर यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. मालिकेतील कलाकार देखील सरोज यांची ही बातमी ऐकताच भावुक झाले असून सर्वांनी सरोज यांना आदरांजली वाहिली आहे.

Title: Marathi Actress Saroj Sukhtankar Passes Away

Tags: Saroj Sukhtankar Passes Away

Leave a Comment