Sapna Choudhary : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री आणि लोकप्रिय हरियाणवी डान्सर सपना चौधरीने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सपना दुसऱ्यांदा आई झाली असून तिने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, सपनाने तिच्या लग्नाच्या बातम्या आणि पहिल्या बाळाच्या जन्माबद्दलची माहिती आधी लपवून ठेवली होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाळाच्या जन्माची बातमीही तिने आतापर्यंत उघडपणे सांगितली नव्हती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या बाळाच्या नामकरण सोहळ्यामुळे तिच्या या गोड बातमीची चर्चा सर्वत्र पसरली आहे.

सपनाने हरियाणाच्या मदनहेडी गावात तिच्या दुसऱ्या मुलाच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात पंजाबी आणि हरियाणवी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. इतकेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील तिचे चाहतेही या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. ‘लाइव्ह हिंदुस्थान’च्या माहितीनुसार, या नामकरण सोहळ्यासाठी जवळपास ३० हजारांहून अधिक लोक जमले होते. यामध्ये सर्वांनी सपनाच्या बाळाला आशीर्वाद दिला आणि या सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
सपनाला आधीपासूनच एक मुलगा आहे, ज्याचे नाव पोरस आहे. आता तिला दुसऱ्या मुलाचा आशीर्वाद मिळाला आहे. तिचा पती वीर साहू यांच्यासोबत तिने जानेवारी २०२० मध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली होती, आणि त्यानंतर काही काळाने तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. दुसऱ्या मुलाच्या नामकरण सोहळ्यात बाळाचे नाव प्रसिद्ध पंजाबी गायक बाबू मान यांच्या हस्ते ठेवण्यात आले. सपनाच्या धाकट्या मुलाचे नाव “शाहवीर” ठेवले गेले आहे.
सध्या सोशल मीडियावर या नामकरण सोहळ्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे, ज्यामध्ये सर्वजण सपनाच्या मुलाला आशीर्वाद देत आहेत आणि सोहळ्याचा आनंद घेत आहेत.
Tharal Tar Mag : ठरलं तर मग मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात होणार आई.. दिली मोठी गुड न्यूज़..