सैराट चित्रपटातील बाळ्या आणि सल्ल्याची जोडी झळकणार छोट्या पडद्यावरील ‘मन झालं बाजिंद’ या आगामी मालिकेत

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच कलाकारांची भूमिका ही प्रेक्षकांना भुरळ घालण्याजोगीच होती. या सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.या चित्रपटातील लक्षवेधी भूमिका ठरली ते बाळ्या आणि सल्ल्याची जोडी. बाळ्याची भूमिका साकारली ते अभिनेता तान्हाजी गालगुडे याने तर सल्ल्या ची भूमिका साकारली अभिनेता अरबाज शेख याने. आणि आता हीच जोडी छोट्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. झी मराठी वरील नविन येणारी मालिका ‘मनं झालं बाजिंद’ यामध्ये या दोघांची जोडी झळकणार आहे. तर अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भुमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बाळ्या आणि सल्ल्याची भूमिका कोणती असणार, हे दोघे कोणते पात्र साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात जरि असले तरी हे दोघे त्यांच्या तूफान अभिनयाने प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन करणार हे मात्र नक्की आहे.

तर तुम्ही बाळ्या आणि सल्याची जोडी छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा .

Leave a Comment