आई होणे प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदायक गोष्ट असते. सिनेसृष्टीतिल अभिनेत्री आपण आई होणार असल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगतात. काही दिवसांपूर्वी राधा सागरने देखील गोड बातमी चाहत्यांना दिली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच सई लोकूर आहे. सईने आज सोशल मीडियावर नवऱ्यासोबत फोटो शेअर करून चाहत्यांना गोड अशी बातमी दिली आहे. सई लवकरच आई होणार आहे.
सईने तिच्या पोस्टला एक सुंदर असे कॅप्शन लिहिले आहे, आम्हाला हे सांगण्यात खुप आनंद होत आहे की आमच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. याने आमच्या आयुष्यात खूप आनंद, प्रेम आणि हास्य असेल”. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.
बिग बॉस मराठी पर्व १ मधून सईने खूपच प्रसिद्धी मिळवली होती. सध्या ती मनोरंजन विश्वापासून लांबच आहे. सईने तीर्थदीप रॉयसोबत नोव्हेंबर २०२० मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या २ वर्षानंतर दोघे आई बाबा होणार आहेत. सईने बंगाली आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले होते. सईचे लग्न खुप चर्चेत होते.
सई आणि तिच्या नवऱ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी आणि कलाकारांनी होणाऱ्या आई बाबांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. AtoZ मराठी कडून सई आणि तीर्थदीप यांना खुप साऱ्या शुभेच्छा!






