अभिनेत्री सई लोकूर ने दिली प्रेमात असल्याची कबुली.

अभिनेत्री सई लोकूर सोसिअल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. नवीन नवीन फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी शेयर करत असते. अभिनेत्री सई लोकूर सध्या चर्चेत आहे ते तिने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे. नुकताच सई लोकुरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो पोस्ट करून तिच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एका खास व्यक्तीसोबत सई ने हा फोटो शेयर केला असून “स्वर्गात गाठी बांधल्या जातात यावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे अनेक कारणे आहेत आणि मला माझा साथीदार मिळाला.” असे Caption सईने त्या फोटोला दिले आहे. या फोटोवरून तरी सई कोणाच्या तरी प्रेमात असल्याचा खुलासा तिने केला आहे. सई नक्की कोणाच्या प्रेमात आहे हे मात्र अजून गुपित आहे. सई ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे ती व्यक्ती आणि सई पाठमोरे उभे आहेत त्या व्यक्तीचा चेहरा या फोटोत दिसत नाही. आता सईच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती नक्की आहे तरी कोण हे जाणून घेण्याची सर्वानाच उत्सुकता लागली आहे.

https://www.instagram.com/p/CFq0FMSpf_k/

Title : Sai Lokur revealed her relationship

Tags: Sai Lokur in relationship, sai lokur boyfriend, sai lokur husband, sai lokur in love, sai lokur news

Leave a Comment