फलंदाज ऋतुराज गायकवाड नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. त्याने महिला क्रिकेटर उत्कर्षा पवार हिच्या सोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चा खुप होत्या. दोघांची जोडीही खुप सुंदर आहे. सर्वात आकर्षित गोष्ट म्हणजे पहिल्यांदा एका क्रिकेटरने महिला क्रिकेटरशी लग्न केले आहे. छान गोष्ट म्हणजे दोघेही एकाच Field मधून येतात.
ऋतुराजने फोटो पोस्ट करत लिहिले आहे, उत्कर्षा ही माझ्या जीवनाचा हिस्सा आहे. माझा प्रवास अगदी सुरुवातीपासूनच माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या पैलूंबद्दल नेमका माहीत होता. पुढे कॅप्शन मध्ये लिहीत ऋतुराज म्हणतो, उत्कर्षाने ठरवले होते कि महाराष्ट्रियन संस्कृती ही चेन्नईच्या लोकांसाठी आणि साऊथ कल्चर साठी समर्पित करावी कारण चेन्नई city च महत्त्व आणि ऋतुराजसाठी csk टीमने त्याच्या आयुष्यात खुप काही केले आहे. शेवटी त्याने लिहिले आहे I Love YOu! Utkarsha.
ऋतुराज आणि उत्कर्षा साऊथ लुक मध्ये खूपच छान दिसत आहेत. त्यांचा लुक खरंच खुप भारी आहे. सोशल मीडियावर फोटो खूपच व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी कमेन्टचा वर्षाव केला आहे.