लव लग्न लोचा फेम अभिनेत्री रुचिता जाधव ही ३ मे रोजी businessman आनंद माने सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. आता लग्नाआधीच्या सर्व विधींना सुरवात झाली आहे. गुरुवारी म्हणजे काल अभिनेत्री रुचिता जाधव हिने तिच्या घरी पार पडलेल्या ग्रहमुख पुजा चे काही फोटो शेअर केले.
या पारंपरिक विधीव्यतिरिक्त , तिने तिच्या बॅचलर गेट-टुगेदरची झलक देखील दाखवली. त्याचसोबत रुचिताने तीन दिवसांच pre-wedding function देखील ठेवलेल आहे त्यात मेहंदी, संगीत देखील होणार आहे. रुचिता आणि आनंद माने हे पाचगणी येथील फार्महाऊसमध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या हजेरीत लग्न करणार आहे.
तर तुम्हांला रुचिता आणि आनंदची जोडी कशी वाटते हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा .