अभिनेत्री रुचा आपटे आणि अभिनेता क्षितिज दाते यांनी शेयर केला साखरपुड्याचा खास फोटो

सध्या मराठी कलाविश्वात आपण पाहत आहोत की कोणी लग्न बंधनात अडकत आहे, कोणी साखरपुडा करत आहे तर कोणी आपल्या नात्याची कबुली देत आहेत. लॉकडाऊनमुळे बऱ्याच मराठी कलाकारांनी आपले लग्न पुढे ढकलले होते. त्यामुळे ह्या वर्षी बरेच मराठी कलाकार विवाह बंधनात अडकले आहेत तर काहीजण अजून लग्नबंधनात अडकणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आत्ता असेच एका मराठी सेलेब्रिटी जोडप्याने आपल्या नात्याची कबुली देत आपला साखरपुडा देखील एक वर्षापूर्वी झाल्याची बातमी दिली आहे. तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री ऋचा आपटे आणि मुळशी पॅटर्न फेम अभिनेता क्षितिज दाते यांची एंगेजमेंट गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये झाली होती. आत्ता पर्यंत त्यांच्या या साखरपुड्या बद्दल कोणालाही माहीत नव्हते. परंतु आज त्यांच्या एंगेजमेंटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर त्यांच्या एंगेजमेंटचा एक फोटो पोस्ट केला आहे. पोस्टखाली मराठी कलाकार आणि त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री ऋचा आपटे हिने सुप्रसिद्ध मालिका तुझ्यात जीव रंगला, साथ दे तू मला यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेता क्षितिज दाते याने मुळशी पॅटर्न या चित्रपटात राहुल्याच्या मित्राची महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

तर मित्रांनो अभिनेता क्षितिज दाते आणि अभिनेत्री ऋचा आपटे यांची जोडी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: Rucha Apte and Kshitij Date Engagement, Rucha Apte and Kshitij Date Sakharpuda

Leave a Comment