दिवाळीमध्ये सगळ्यांसोबतच बॉलीवुड कलाकारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला. बॉलीवुडच्या सगळ्याच कलाकारांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्तेक वर्षीच्या दिवळीप्रमाणे ह्या वर्षीच्या दिवाळीतही अभिनेता रितेश देशमुख याने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. रितेश नेहमीच एका अनोख्या शैलीत चाहत्यांना शुभेच्छा देत असतो.
या वर्षीच्या दिवळीतही त्याने हटके व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख आपल्या दोन मुलांसह कुर्ता – पायजमा परिधान केलेला आपण पाहिला आहे आणि विशेष म्हणजे हे कपडे त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून तयार केले गेले आहेत. स्वतः रितेश याने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. ह्या व्हिडिओमध्ये रितेशची आई हवेत साडी झटकताना दिसत आहे तर काही सेकंदातच रितेश देशमुख आणि त्याची दोन मुले एकाच रंगाची कपडे घालून दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपण पाहिलं आहे.
”आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे. दिवाळीच्या शुभेच्छा” असे कॅप्शन देत रितेशने हा व्हिडिओ शेअर केला आणि विशेष म्हणजे ह्या व्हिडिओला काही वेळातच लाखों व्हुज मिळाले. रितेशच्या ह्या पेहरावाला चाहत्यांकडून कौतुकाची पावती देखील मिळाली. खरोखरच रितेशच्या ह्या पेहरावात ‘मायेची ऊब’ दिसून आली. रितेशच्या ह्या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत .
Title: Riteish Deshmukh made kurta from his mother saree