हे मराठी कलाकार चालवत आहेत आईचा वारसा . . . .

आपल्या मराठी मनोरंजन विश्वात अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांच्या आईचा या मराठी इंडस्ट्री मद्धे खूप मोलाचा वाटा आहे . आणि त्यांचा वारसा घेऊन ही कलाकार मंडळी पुढे जात आहेत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

      चला तर  मग आज जाणून घेऊयात अश्या कलाकारांविषयी जे आपल्या आईच्या पाऊलावर पाऊल टाकून मराठी इंडस्ट्री मद्धे प्रेक्षकांच्या मनात एक स्वतःच स्थान निर्माण करत आहेत.

  • सिद्धार्थ चांदेकर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे मराठी इंडस्ट्री मधील एक नावाजलेल नाव आहे . सिद्धार्थ चा अभिनय सगळ्यांनाच खूप आवडतो . सिद्धार्थ चांदेकरच्या आईचे नाव सीमा चांदेकर असे असुन त्या एक अभिनेत्री आहेत. सिद्धार्थ आणि त्याच्या आईने स्टार प्रवाह वाहिनी वरील जिवलगा या मालिकेत माय लेकाची भूमिका साकारली होती. जे की ते खऱ्या आयुष्यातले मायलेक आहे. सिद्धार्थ चांदेकरला आता आपण स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘सांग तु आहेस का?’ या मालिकेत पाहतचं आहोत.

  • सोहम बांदेकर

अभिनेता सोहम बांदेकर हा प्रसिद्ध अभिनेत्री सूचित्रा बांदेकर आणि अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा आहे. स्टार प्रवाह वर सुरू झालेली नवी मालिका ‘नवे लक्ष्य’ हयाद्वारे त्याने या अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल आहे. या मालिकेत तो इन्स्पेक्टर जय ची भूमिका साकारत आहे. या मालिकेचे निर्माते त्याचेच आई बाबा आहेत. त्याची आई म्हणजे अभिनेत्री सूचित्रा बांदेकर यांनी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, सिंगम, सिंबा , इश्क वाला लव यांसारख्या अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमद्धे कामं केलेल आहे .

  • सखी गोखले

अभिनेत्री सखी गोखले हिला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली . ही तिची पहिलीच मालिका होती . यानंतर तिला चाहतावर्ग देखील मिळाला. या अभिनेत्रीची आई देखील उत्तम अभिनेत्री आहे . त्यांच नाव आहे अभिनेत्री शुभांगी गोखले . अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी अनेक मराठी मालिकांमद्धे कामं केलेली आहेत. कलर्स मराठी वरील ‘राजा राणी ची गं जोडी’ या मालिकेत त्या रंजीत च्या आईची भूमिका साकारत आहेत. तसेच झी मराठी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत देखील त्या काम करत आहेत. यात त्या ओम च्या आईची भूमिका साकारताना दिसत आहेत.

  • स्वानंदी बेर्डे आणि अभिनय बेर्डे   

स्वानंदी आणि अभिनय बेर्डे भाऊ बहीण असुन ते सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलं आहेत. अभिनेता अभिनय बेर्डे याने ‘ती सध्या काय करते?’ या मराठी चित्रपटातून कलाक्षेत्रात पदार्पण केल. त्यांनंतर त्याने अजुन काही मराठी चित्रपटांमद्धेही कामं केलेली आहेत. अभिनेत्री स्वानंदी बेर्डे हिने देखील आईच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. ‘respect’ या चित्रपटाद्वारे तिने मराठी इंडस्ट्री मध्ये पदार्पण केल. या दोन्ही कलाकारांची आई म्हणजे अभिनेत्री प्रिया बेर्डे. अभिनेत्री प्रिया बेर्डे या अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ ह्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आणि अनेक मराठी चित्रपट गाजवले. आता अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि अभिनेत्री स्वानंदी बेर्डे यांना एकत्र काम करताना पाहणार आहोत. ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या नाटकाद्वारे या मायलेकी एकत्र काम करताना आपल्याला दिसणार आहे.

  • विराजस कुलकर्णी

अभिनेता विराजस कुलकर्णी याला देखील त्याच्या आईकडून अभिनयाचं बाळकडू मिळालेलं आहे.  विराजसने hostel days या मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. अभिनेता विराजस कुलकर्णी याच्या आईचे नाव अभिनेत्री मृणाल कुलकर्णी असे आहे. यांनी देखील फत्तेशीकस्त, येरे येरे पैसा , रमा माधव  यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमद्धे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहे. स्टार प्लस वरील सोनपरी ह्या मालिकेमुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांनी अनेक मराठी शॉर्ट फिल्म्स देखील केलेल्या आहेत. या दोन्ही मायलेकांनी  एकत्र कामं केलेला ‘Ti and Ti’ हा चित्रपट जो  चित्रपट अभिनेता विराजस कुलकर्णी याने लिहिला होता. आणि आता आपण अभिनेता विराजस कुलकर्णी याला झी मराठी वाहिनी वरील ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेत पाहतचं आहोत.

  • श्रीया पिळगावंकर

अभिनेत्री श्रीया पिळगावंकर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावंकर आणि अभिनेते सचिन पिळगावंकर यांची मुलगी आहे. श्रीया ने ‘एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून कलाविश्वात एंट्री केली ज्या चित्रपटात सचिन पिळगावंकर यांनी तिच्या बाबा ची भूमिका साकारली होती जे तिच्या खऱ्या आयुष्यातले बाबा आहेत. तसेच श्रीयाने हिंदी आणि साऊथ चित्रपटांमद्धेही कामं केलेली आहेत. अभिनेत्री सुप्रिया पिळगावंकर ह्या तिची आई आहेत. सुप्रिया पिळगावंकर यांच्याबद्दल तुम्हांला वेगळ सांगायची गरज नाही यांनी आजपर्यंत अनेक मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवी ,आम्ही सातपुते अश्या चित्रपटमद्धे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. चित्रपटांसोबतच हिंदी मालिकांमद्धे देखील त्यांनी कामं केलेली आहेत.

  • सई मांजरेकर

अभिनेत्री सई मांजरेकर ही प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी आहे. सई ने दबंग ३ ह्या चित्रपटाद्वारे बॉलीवुड मध्ये एंट्री मारलेली आहे. यात ती अभिनेता सलमान खान सोबत झळकली होती. सई च्या आईचे नाव मेधा मांजरेकर असे आहे त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्यांनी मराठी चित्रपट केले त्यात काकस्पर्श , दे धक्का, नटसम्राट, बंध नायलॉनचे, यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होतो. तसेच त्यांनी दबंग ३ ह्या हिंदी चित्रपटात देखील काम केलेल आहे.

तर तुम्हांला कोणत्या मायलेकराची जोडी जास्त आवडते हे आम्हांला कोंमेंट्स मद्धे जरूर कळवा .

  

Leave a Comment