कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेत कावेरी आणि राज यांनी अनेक संकटांवर यशस्वीरित्या मात केली. आजवर आलेल्या अनेक संकटानामध्ये त्यांना रतनामालची साथ मिळाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून प्रेक्षकांची उत्कंठ शिगेला पोहचली आहे की माणूस कोण असेल आणि त्यांचा ह्या परिवाराशी काय संबंध असेल असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आले पण हा व्यक्ती दुसरा तीसरा कोणी नसून रत्नमालाचा नवरा अनिरुद्ध आहे आणि याचमुळे आता मालिकेला एक वेगळा वळण मिळणार आहे.
अनेक वर्षांनी अचानक मेलेला नवरा समोर आला? तो जिवंत कसा? जिवंत होता तर इतकी वर्ष कुठे होता? घरी का नसेल आला? असे अनेक प्रश्न रत्नमालाबरोबरच प्रेक्षकांना पडणार आहेत. त्यामुळे रत्नमाला मोहितेचा भूतकाळ आता प्रेक्षकांसमोर येणार आहे तेव्हा नक्की बघा भाग्य दिले तू मला कलर्स मराठीवर रात्री ९.३० वा. अनिरुद्धचे पात्र आपल्या सगळ्यांचे आवडते तुषार दळवी साकारणार आहेत.
निवेदिता सराफ म्हणजेच रत्नमाला मालिकेत येणाऱ्या नवीन वळणाबद्दल म्हणाल्या, “प्रेक्षकांनी आतापर्यंत आमच्या मालिकेला भरभरून आम्हाला तुम्ही प्रतिसाद दिलात. आता आमची मालिका एक नवीन वळण घेते आहे. आता रत्नमालाच्या पूर्वायुष्यातला एक खूप मोठं रहस्य लोकांसमोर येणार आहे आणि ते रहस्य म्हणजे रत्नमालाचे पती जिवंत आहेत असं लवकरच प्रेक्षकांना आणि रत्नमलालाही कळणार आहे. त्यांचं नाव आहे अनिरुद्ध. अनिरुद्ध कुठे होते? काय झालं? रत्नमालाला का भेटले नाही इतक्या वर्षात?, आताच का समोर आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ही मालिका बघता बघता मिळणार आहे. आणि त्यामुळे नक्कीच तूमचं खूप मनोरंजन होणार आहे. हे मलिकेतलं नवं वळण नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. त्याचबरोबर माझा खूप चांगला मित्र आणि आवडता सह कलाकार तुषार दळवी ही भूमिका साकारतोय त्यामुळे ही मला खूप आनंद झाला आहे कारण मी तुषार बरोबर आधी ही काम केलं आहे. आमचा खूप छान इक्वेशन आहे. तुषारसारख्या सीनियर एक्टर बरोबर काम करायला खूप मजा येत आहे. तुषार या व्यक्तिरेखेमध्ये काम करतोय ही खूप छान गोष्ट आमच्या मालिकेत घडली. खूप वेगवेगळी छान वळणं या मालिकेत तुमच्या नजरेसमोर येणार आहेत, खूप इमोशनल सिन्स असणार आहेत पुढे काय काय होतंय याची उत्सुकता माझी ही ताणली गेली आहे तुमची ही ताणली जाणार आहे.”
आता या मालिकेला एक वेगळं वळण मिळालं आहे. रत्नमालाला ऑफिसमध्ये मंगळसूत्र मिळतं. त्यानंतर तिला अनिरुद्धने दिलेल्या मंगळसूत्रची आठवण होते. तेव्हा झालेले संभाषण तिला आठवते. अनिरुद्धने रत्नमाला आधी त्यांच्या गावी गुहागारला राहात असताना अनिरुद्धने रत्नमालाला मंगळसूत्र दिले होते. त्या काळच्या गोष्टी तिला आठवतात. रत्नमाला आधीपासूनच तत्वांना धरून चालणारी आहे. त्या काळी सुध्दा जेव्हा अनिरुद्ध व तिचे मतभेद व्हायचे तेव्हा ही ती तिच्या मतांवर ठाम असायची. आणि अनिरुद्धचे मतभेद व्हायचे तेव्हा. तिच्या नवऱ्याला तिचे हे तत्व पटत नव्हते.
आता मालिकेत अनिरुद्ध आणि रत्नमालाची कहाणी बघायला मिळणार आहे आणि याचनिमिताने रत्नमालाचा नवा लूक देखील समोर येणार आहे ज्यामध्ये तिला भूतकाळातील नवऱ्या सोबत काही क्षण आठवणार आहे. मालिकेत अजून काय काय घडणार जाणून घेण्यासाठी बघत राहा आपली लाडकी मालिका भाग्य दिले तू मला कलर्स मराठीवर रात्री ९.३० वा.








