कलर्स मराठीवरील रमाराघव मालिका हळूहळू प्रेक्षकांची आवडती मालिका होत चालली आहे. रमाराघव ही मालिका खुप छान वळण घेत आहे. रमा आणि राघव एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. राघवचा तिरस्कार करणारी रमा आत्ता राघवच्या प्रेमात पडली आहे. राघवही रमाच्या प्रेमात आहे. या दोघांपैकी कोण प्रेमाची कबुली देईल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक खुप उत्सुक आहेत. या दोघांची लवस्टोरी कधी सुरू होईल याची प्रेक्षक चांगलीच वाट पाहत आहेत.
मुंबई २४ मे, २०२३ – कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या मालिकेत सध्या रमाची आई लावण्याने पुरोहितांना धडा शिकवून रमाला पुन्हा आपल्या घरी आणण्याचा चंग बांधला आहे,त्यासाठी तिचा जाहीर अपमान करणाऱ्या श्रुतीच्या आयुष्यात एक लफंगा मुलगा आणून तिच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याची आणि पर्यायाने पुरोहितांच्या संस्कारांची लक्तरे वेशीवर टांगण्याची लावण्याची खेळी आहे. तिची ही खेळी पुरोहितांच्या बाजूने रमा उधळून लावण्यात यशस्वी ठरणार का ? की आईमुळे रमा अडचणीत येणार ? राघवला जेव्हा हे कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल याची उत्कंठावर्धक गोष्ट मालिकेत उलगडत असून श्रुतीच्या प्रकरणाचा तपास करण्याआधी रमा राघव देवाचे आशीर्वाद घेतात. तेव्हा कौल कसा लावला जातो, हे राघव रमाला समजावून सांगतो. तेव्हा रमा ती प्रेमात पडली आहे का ? याचे उत्तर देवबाप्पाकडे मागते. कौल होकारार्थी असल्याने या दोघांपैकी कोण आधी प्रेमाची कबुली देणार या प्रश्नाचे उत्तर रमाच्या बाजूने एक घर पुढे सरकते.
कोण देणार प्रेमाची कबुली रमा की राघव ? जाणून घेण्यासाठी बघा महा गुरुवार उद्या रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर!