मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील सध्या एका पोस्टमुळे खूप चर्चेत आले आहे. त्यात त्यांनी आजारपणामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल लिहिले आहे. यावर अनेकांनी पाटील यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून आजारपणाला कंटाळलेल्या राजन पाटील यांनी आता आपल्याला जगण्यात काही स्वारस्य उरले नसल्याचं म्हटलं आहे.
माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहे. या शब्दात म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. यावर अनेकांनी त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. राजन पाटील हे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.
“नमस्कार मंडळी, माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत. मानसिक दृष्ट्या मी हरलो आहे. माझं जगणं ही जगणं उरलं नाही. केवळ जिवंत राहण एवढंच राहिलय. मला त्यात स्वारस्य नाही. तुम्ही माझ्यासाठी एक करा, मृत्यूने मला लवकर घेऊन जावे, अशी प्रार्थना कारा. नमस्कार, राजन पाटील ’’, अशी पोस्ट त्यांनी फेसबूकवर शेअर केली. त्यांच्या ह्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राजन पाटील हे अभिनयासोबतच लेखकही आहेत. रंग माझा, माझी माणसं ही पुस्तक त्यांनी लिहिल आहेत. सोबतच रायगडाला जेव्हा जाग येते, तोची एक समर्थ, तरुण तुर्क म्हातारे अर्क, मित्र, शर्यत, बरड, मुंबई आमचीच अशा अनेक नाटक चित्रपट व मालिकांत त्यांनी काम केले आहे.
Title: Rajan Patil facebook post