Raj Thakre and Ankita : अंकिताच्या लग्नाच पहिलं आमंत्रण ‘राज ठाकरे ‘ यांना .. अंकिताने सांगितली भावनिक गोष्ट..

Raj Thakre and Ankita : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर, गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी मुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर रील्स बनवून अंकिताने खूप लोकप्रियता मिळवली आहे, आणि तिच्या मजेशीर, भावनिक आणि सहज शैलीने ती घराघरांत पोहोचली. तिच्या साध्या परंतु दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांमध्ये ती लवकरच पसंतीस उतरली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Raj Thakre and Ankita
Raj Thakre and Ankita

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर अंकिताने आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल खुलासे केले होते. तिने शोदरम्यान सांगितलं होतं की, ती लवकरच लग्न करणार आहे , आणि तिचा होणारा नवरा एक संगीत दिग्दर्शक आहे. मात्र, तिने त्यावेळी त्याचा चेहरा किंवा नाव उघड केले नव्हत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. अनेकजण तिला तिचा होणारा नवरा कोण आहे हे विचारत होते. दुसरीकडे, सोशल मीडियावरील काही चाहत्यांनी तिच्या बॉयफ्रेंडबद्दल अंदाज लावला होता.

Dhananjay Powar : आपली पायरी आपणच… अस का म्हणतोय डी पी.. बिग बॉस नंतर अस काय झाल?

अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने आपल्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. “सूर जुळले…” असं कॅप्शन देत तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव उघड केलं – कुणाल भगत, जो एक प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर अंकितावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव झाला.

या सगळ्यात, अंकिताने शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ विशेष चर्चेचा विषय ठरला. या व्हिडीओमध्ये तिने लग्नाची बातमी सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगितल्याचं उघड केलं. हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाला. आता पाहूयात, अंकिता नेमकं काय म्हणाली ते.

अंकिता काय म्हणाली?

अंकिता वालावलकरने आपल्या भावनिक शैलीत सांगितलं, “नमस्कार मंडळी, बिग बॉसच्या घरातील तुम्ही माझा प्रवास पाहिला आहे. मी एक खूप इमोशनल मुलगी आहे, माझ्या भावना खूप तीव्र आहेत. आमचं लग्न ठरत असताना एक गमतीशीर घटना घडली होती. माझ्या आणि कुणालच्या खूप गुण जुळतात, आणि आमच्या इमोशन्सही जुळतात. पण त्या इमोशन्समध्ये एक महत्त्वाची व्यक्ती आहे – माननीय राज ठाकरे साहेब.”

Bigg Boss Marathi 5 Suraj Chavhan : ना लिहीता येत ना वाचता येत, मग लोकांचे फ़ोन नंबर कसे लक्षात टेवतो सूरज आणि मोबाईल कसा वापरतो, कास्टिंग डायरेक्टर ने सांगितला भन्नाट किस्सा…

तिने पुढे सांगितलं, “काही दिवसांपूर्वी ‘येक नंबर’ या चित्रपटाचं काम चालू होतं, आणि मला समजलं की कुणाल त्या चित्रपटासाठी संगीत देत आहे. तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याचदरम्यान, आमच्या लग्नाबद्दलची बातमी आम्ही सर्वात आधी राज साहेबांना दिली होती.”

अंकिता पुढे म्हणाली, “राज साहेबांना आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीच आमच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण नंतर बिग बॉसमुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या. येक नंबर चित्रपटातील ‘तू आभाळ’ या गाण्यासाठी कुणालने खूप मेहनत घेतली, आणि त्या गाण्याबरोबर आमच्या खूप साऱ्या भावना जोडल्या गेल्या आहेत.”

Aarya Jadhav : थोबाडीत मारुन सुद्धा आर्याला घरातच टेवल असत तर.. केदार शिंदे स्पष्टच बोलले..

पुढील काही महिन्यांत विवाह

अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या काही महिन्यांत त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होईल. बिग बॉस मराठीचा शो संपल्यानंतर अंकिता पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया ऐक्टिव झाली आहे.

Leave a Comment